आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्कॉम संघटनेचा 43 वा वर्धापन दिन:5 हजारावर ज्येष्ठ नागरिकांचा एकसंघ; सोशल मीडियावरही अनेक सदस्य सक्रिय

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनाची संध्याकाळ समवयस्क मंडळींसोबत सुख-दुःखात घालवावी, अडचणीत एकमेकांत मदत करावी, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांना एकत्र यावेसे वाटते. आणि यातूनच ज्येष्ठ नागरिक संघाचा उदय झाला. फेस्कॉम या देशव्यापी संघटनेने या कामी पुढाकार घेतला आहे.

जिल्हाभरात ज्येष्ठनागरिक संघाचे जाळे वाढविले आहे. या माध्यमातून 76 पेक्षा अधिक संघ संलग्न झाले आहेत. याद्वारे शहरातील सुमारे 5 हजारापेक्षा अधिक ज्येष्ठांना संघाने एकसंघ केले आहे. तंत्रज्ञानाच्या बदलानुसार ज्येष्ठ नागरिक सदस्य सोशल मीडियावरही क्रियाशील असून शासनाच्या हेल्पलाईनवरूनही ते आवश्यक ते मार्गदर्शन मदत घेत आहेत.

महाराष्ट्र ज्येष्ठनागरिक महासंघ ( फेस्कॉम) 12 डिसेंबर 1980 मध्ये स्थापन झालेली संघटना 43 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. फेस्कॉम 42 वर्षापांसून ज्येष्ठ नागरिकांच्या सुखी, समाधानी, निरामय, आरोग्यमय जीवनासाठी तसेच सन्मानपूर्ण उर्वरित आयुष्यासाठी काम करत आहे. यासाठी फेस्कॉमचे कार्य सुरू असल्याचेही फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी यांनी सांगितले.

सोशल मीडियावरही सक्रिय

ज्येष्ठनागरिक संघातील सदस्यांसह अनेक सदस्य आता सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. काही संघानी अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक, व्हाट्सप, यु ट्यूब चॅनलचा वापर सुरू केला आहे. डिजीटल माध्यमांशी जोडता यावे, यासाठी फेस्कॉम मार्फत डिजीटल अकॅडमीही सुरु करण्यात आली आहे, त्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. झूमद्वारे मिटींग घेणे, व्हॉटसपद्वारे संघाच्या कार्यक्रमांची माहिती देणे अशा प्रकारे सोशल मिडीयाचा वापर सदस्यांकडून होत आहे.

ज्येष्ठांसाठी 14567 हेल्पलाइन

'ज्येष्ठांसाठी नॅशनल हेल्पलाइन सेवा उपलब्ध असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकारी आहे. ज्येष्ठांना काही अडचण आल्यास, कोणी त्रास देत असल्यास १४५६७ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यास मदत मिळते. दर महिन्याला सुमारे ४०० पेक्षा अधिक ज्येष्ठ या सुविधेचा लाभ घेतात. गैरवर्तवणुक, पेन्शनसह, घरगुती वाद याविषयीच्या तक्रारी येत असून वेळप्रसंगी पोलिसांच्या मदतीने त्या सोडविल्या जात असल्याचे हेल्पलाईनचे फिल्ड ऑफीसर मिनाक्षी कोळी यांनी सांगितले.

यासाठी फेस्कॉमचा लढा

ज्येष्ठांच्या आर्थीक, कौटूंबिक, आरोग्य तसेच सामाजिक विषयक समस्या सोडविण्यासाठी ‘ फेस्कॉम’ आघाडी घेत आहे. एफडीआर मध्ये ज्येष्ठांना सवलत मिळावी, ज्येष्ठांचे स्वतंत्र आयुक्तालय तयार करावे,.

अशी आहे स्थिती

राज्यात 5 हजार ज्येष्ठ नागरिक संघ

450 महिला ज्येष्ठ मंडळे

जिल्ह्यात 76 पैकी 63 संघ संलग्न

महिलांचे स्वतंत्र संघ - 3

शहरात फेस्कॉम संलग्न - 4

शहरात महिला संघ - 1

शहरात जुळलेले ज्येष्ठ नागरिक - 5 हजारावर

बातम्या आणखी आहेत...