आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणी सोमवारामुळे मंदिरात गर्दी:उत्तर-दक्षिण भारतीय श्रावण महिन्यामुळे ओंकारेश्वर मंदिरात 45 दिवस त्रिकालाभिषेक

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्ताने शहरातील शिवालयांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तर ओंकारेश्वर मंदिरात उत्तर-दक्षिण भारतीय श्रावणानिमित्ताने 18 जुलैपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांसह 45 दिवसांपर्यंत त्रिकालाभिषेक होत आहे. त्यामुळे ओंकारेश्वर मंदिरात उत्तर व दक्षिण अशा 45 दिवसांच्या श्रावण सोमवारदरम्यान एकूण 6 श्रावण सोमवारी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

शहरातील 50 वर्षे पूर्ण झालेल्या ओंकारेश्वर मंदिरात उत्तर व दक्षिण भारतीय श्रावण महिना मनवण्यात येतो. या दोन्ही श्रावण महिन्यात एकूण 45 दिवस मंदिरात त्रिकालाभिषेक करण्यात येतो. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना हा 18 जुलैपासून तर दक्षिण भारतीय श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू झाला.

त्यामुळे 45 दिवस उत्तर व दक्षिण भारतीय श्रावण महिन्यात ओंकारेश्वर मंदिरात त्रिकालाभिषेकासह विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. उत्तर भारतातील श्रावण महिना 18 जुलैला सुरू झाल्याने 1 ऑगस्टचा श्रावण सोमवार हा तिसरा तर दक्षिण भारतीयांचा हा पहिलाचा श्रावण सोमवार असल्याने 1 ऑगस्टला शहरातील सर्वच महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. ओंकारेश्वर मंदिर, शिवधाम मंदिर, गोलाणी मार्केटमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील महादेव व मेहरूणमधील शिव मंदिरासह शहरातील सर्वच शिवालयांमध्ये पहाटे पाच वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभर ‘ओम नम: शिवाय..’, ‘हर-हर महादेव..’च्या गजरासह मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिमय झाले होते. दुपारी 12 वाजता ओंकारेश्वर मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक पूजा केली.

अभिषेकासाठी स्वतंत्र व्यवस्था

ओंकारेश्वर मंदिर व शिवधाम मंदिरांत महिला आणि पुरुषांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अभिषेक करण्याची स्वतंत्ररीत्या सुविधाही करण्यात आली आहे. भाविकांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र पाइपांचे रेलिंग लावण्यात आल्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यास आडचण आली नाही. पहिल्या सोमवार निमित्ताने मंदिरात सकाळी पाचपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

बातम्या आणखी आहेत...