आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॅगन्स उपलब्ध नसल्‍याने:केळीचे रॅक उशिरा पोहोचल्याने तब्बल 45 लाखांचे नुकसान

सावदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी देखील रडकुंडीला आले आहेत. कारण, यापूर्वी सावद्याहून दिल्लीतील आदर्शनगर मंडीपर्यंत केळी वाहतुकीसाठी वेळेवर वॅगन्स उपलब्ध झाल्या नाहीत. आता बीसीएन वॅगन्स वेळेवर उपलब्ध होत असल्या तरी ही गाडी तिसऱ्या ऐवजी पाचव्या दिवशी दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचते. यामुळे रस्त्यात केळीची प्रतवारी खराब होऊन ती कवडीमोल भावाने विक्री करावी लागते. या पद्धतीने सावद्याहून पाठवलेले तीन रॅक उशिराने पोहोचल्याने शेतकऱ्यांचे तब्बल ४५ लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

डी.के.महाजन, कडू चौधरी, वसंत महाजन, नंदकिशोर महाजन, संतोष पाटील, नरेंद्र सतेजा, प्रवीण डिंगरा, वसंत पाटील, राहुल पाटील, कुंदन सुपे, प्रथमेश डाके या फळ बागायतदार युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सावदा रेल्वे स्थानकावर पत्रकार परिषद घेतली. त्यात रेल्वेद्वारे केळीची वाहतूक तब्बल ८ वर्षे बंद होती. यानंतर महत्प्रयासाने सावदा रेल्वे स्टेशनवरून केळी वाहतूक सुरू झाली. सुरुवातीला किसान एक्स्प्रेस द्वारे केळी दिल्ली येथील आदर्श नगर मंडीत पोहोचत होती. मात्र, उन्हाळ्यात कोळसा वाहतुकीचे कारण पुढे करत अनुदानित किसान एक्स्प्रेस रेल्वे विभागाने बंद केली. शेतकऱ्यांनी पूर्ण भाडे देऊ केल्यानंतर व्हीपीएन बॅगन्स व बीसीएन वॅगन्स उपलब्ध केल्या. मात्र, या वॅगन्स वेळेवर उपलब्ध होत असल्या तरी प्रवासात मध्ये होणाऱ्या विलंबाने आझादपूर मंडीपर्यंत केळी तिसऱ्या ऐवजी पाचव्या दिवशी पोहोचते. यामुळे प्रवासात प्रतवारी खराब होऊन माल कवडीमोल दराने विक्री करावा लागतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे ४५ लाखांचे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...