आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावात सोन्याचे अलंकार घडवणारे किमान ३०० कारखाने असून त्यात रोज ४५०० कारागीर काम करतात. किती ग्रॅम सोन्याचे दागिने बनवले यावर त्यांना मिळणारी मजूरी ठरते. दागिन्यांसाठी सोन्याची तार-पत्रा बनविणे, सफाई करताना ब्रशने ते घासणे अशा कामामुळे सोन्याचे सूक्ष्म कण उडतात. सुवर्णस्पर्श झाल्यामुळे या कारागिरांचे अंगावरचे कपडे, आसन, पायपुसणे, फरशीपुसणे, तिथला कचरा, सोने चमकविण्यासाठी वापरले जाणारे पाणी, कारागिरांचे हात धुतल्यानंतर निघणारे पाणी या सर्वांनाच किंमत मिळते. यातून एका कामगारामागे महिनाभरात सुमारे २१०० रुपयांचे ४०० मिलीग्रॅम सोने निघते.
अशी घेतली जाते काळजी
कारागिर गादीवजा आसनावर बसून दागिने घडवतात. त्या गाद्या फाटल्या तरी सांभाळून ठेवल्या जातात. पायपुसणे, फरशीपुसणे हे देखील निरुपयोगी झाले तरी सांभाळून ठेवले जाते आणि नंतर एकत्रितपणे विकले जाते. कारखान्यात वापरण्यासाठी कारागिरांना स्वतंत्र कपडे दिले जातात. ते कपडे घालून ते घरी जाऊ शकत नाहीत. कारागिरांचे हात धुतलेले, दागिने धुतलेले पाणी वर्षभर गोळा करून नंतर ते गुजरातच्या व्यापाऱ्यांना विकले जाते. कारखान्यातील कचरा एका मोठ्या ड्रमात संकलित करून ठेवला जातो आणि नंतर विकला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.