आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल दिन विशेष:3 उपजिल्हाधिकारी, 2 तहसीलदारांसह 46 उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल दिनी सोमवारी प्रशासनातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 46 महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तीन उपजिल्हाधिकारी,जिल्हा खनिकर्म अधिकारी, दोन तहसीलदार, तीन नायब तहसीलदार, चार मंडळ अधिकारी, नऊ अव्वल कारकून, अकरा महसूल सहायक, पाच तलाठी, एक वाहनचालक, प्रत्येकी चार शिपाई व कोतवाल यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. संवर्गनिहाय पुरस्कारांचे निकष निश्चीत करण्यात आलेले आहेत. सर्व संवर्गासाठी गेल्या आर्थिक वर्षातील कामगिरी विचारात घेण्यात आली. सेवाकाळात विभागीय चौकशी किंवा शासनाने दाखल केलेले फौजदारी गुन्हे, गोपनिय अहवालाच्या प्रतवारीत प्रतिकूल शेरे नसलेले या निकषांवर निवड करण्यात आली.

पुरस्कारारार्थी उपजिल्हाधिकारी :

महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण,

तहसीलदार : कैलास चावडे पाचोरा, मिलिंदकुमार वाघ, अमळनेर,

नायब तहसीलदार : निकेतन वाळे मुक्ताईनगर, अंगद आसटकर भुसावळ,

मंडळ अधिकारी : विठोबा पाटील रावेर, उदय निंबाळकर एरंडोल, सचिन जगताप रावेर, किशोर तायडे मुक्ताईनगर, अव्वल कारकून : देवेंद्र कोळी एरंडोल, सारिका भालेराव बोदवड, दिलीप राजपूत भडगाव, मधुकर नंदनवार एरंडोल, पल्लवी खडके, जयश्री पवार, अमोल जुमडे, गणेश हटकर, जागृती पवार जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल सहायक : सोमिनाथ वाघ जामनेर, पंकज भागवत भडगाव, तुषांत अहिरे चाळीसगाव, गणेश नाईक पारोळा, पंकज शिंदे धरणगाव, अमोल पाटील जिल्हाधिकारी कार्यालय, जगदिश पाटील अमळनेर, अमोल पाटील उपविभागीय अधिकारी कार्यालय भुसावळ, स्वप्नील येवले जिल्हाधिकारी कार्यालय, विशाल बिहाडे जिल्हाधिकारी कार्यालय, राजश्री पाचपोर जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी : सलमान तडवी एरंडोल, भूषण बाविस्कर पारोळा, पवन नवगाळे भुसावळ, मृणाली सोनवणे जळगाव, अजय पावरा चोपडा, वाहनचालक कैलास माळी पारोळा, शिपाई : गोपिचंद महाजन पाचोरा, संजय वराडे जळगाव, मदन काळे जळगाव, सुशील पाटील जळगाव, कोतवाल : संजय अंबेकर जामनेर, विनोद अटकाळे रावेर, सोनूसिंग पाटील यावल व शिवाजी इप्पर चाळीसगाव.

बातम्या आणखी आहेत...