आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यांचा विक्री-खरेदी व्यवहार:जळगावात 50% सराफांची हाॅलमार्कसाठी नाेंदणी नाही

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने देशातील प्रत्येक दाेन ग्रॅम साेन्याच्या दागिन्यांचा विक्री-खरेदी व्यवहार हा हाॅलमार्कने असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक सुवर्ण व्यावसायिकाला हाॅलमार्किंगची नाेंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी सुवर्णनगरी म्हणून देशात आेळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारातील ५० टक्के व्यावसायिकांनी अद्याप हाॅलमार्किंगची नाेंदणी केलेली नाही. दरम्यान, पुढील महिन्यात ही नाेंदणी करण्यात येणार असल्याचे जळगाव येथील शहर सराफ असाेसिएशनचे म्हणणे आहे.

भारतीय मानक ब्युराेतर्फे (बीआयएस) दाेन महिन्यांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब अधाेरेखित केली हाेती. जिल्ह्यात साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास सुवर्ण व्यावसायिक आहेत. तर शहरात त्यांची संख्या सव्वाशेच्या वर आहे. हे सर्व सुवर्ण व्यावसायिक हाॅलमार्क असलेले साेन्याचे दागिनेच विक्री करतात; परंतु ते दुसऱ्याकडून घेऊन विक्री करतात. त्यामुळे ते शुद्धच असतात. पण कायद्याने ज्या व्यावसायिकांची उलाढाल ४० लाखांच्या वर आहे. त्यांनी हाॅलमार्क तातडीने नाेंदणी करणे कायद्यान्वये आवश्यक आहे.

नाेंदणीसाठी प्रयत्न करू बीआयएसच्या निकषानुसार ज्या व्यावासायिकांना हाॅलमार्क नाेंदणी आवश्यक आहे. त्यांच्यासाठी शहर सराफ असाेसिएशन पुढील महिन्यात पुढाकार घेऊन सर्वांच्या नाेंदणीसाठी प्रयत्न करणार. अजय ललवाणी, अध्यक्ष: शहर सराफ असाेसिएशन, जळगाव

बातम्या आणखी आहेत...