आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकच्च्या मालाच्या किंमतीत ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा फटका जळगावातील चटई उद्योगाला बसला आहे. यासह बाजारात चटई विक्रीला चांगला उठाव नसल्याने एमआयडीसीतील ४० चटई कारखान्यांनी दोन महिन्यांपासून उत्पादन बंद ठेवले आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगाला त्यामुळे ५० कोटी रुपयांचा फटका बसला.
स्थिती पूर्ववत होण्याची आशा
कच्च्या मालाच्या ६० टक्क्यांपर्यंत वाढलेल्या किमती, बाजारपेठेत चटईला चांगला उठाव नाही. या कारणास्तव जळगावातील ४० कारखान्यांनी त्यांचे उत्पादन बंद ठेवलेले आहे. येत्या पंधरा दिवसांत किमती कमी होऊ शकतात.
- महंेद्र रायसोनी,
अध्यक्ष: चटई उद्योग संघटना, जळगाव
जळगावात १५० चटई कारखाने आहेत. त्यात प्लास्टीक दाणा तसेच चटई बनवण्यात येतात. जळगावातून भारतीय बाजारपेठेत प्लास्टीक दाणा व चटईची विक्री करण्यात येत आहे. त्याशिवाय झिरो पान्हे अमेरिका व आखाती देशात निर्यात करण्यात येत आहेत. रिसायकल मटेरियल साऊथ आफ्रीका व इतर देशांत निर्यात केले जाते. सुमारे १०० कोटींची निर्यात जळगावातून होते. निर्यातीवर मात्र काही परिणाम झालेला नाही. चटई कारखान्यांत चीन व बेल्जीयम या देशातून इंपोर्टेड कलरची आयात करण्यात येत आहे. या देशांमधून येणाऱ्या रंगांच्या किंमतींत ६० टक्के वाढ झालेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.