आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहे.याचा तपास नवापूर पोलीसांनी आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला. विमल गुटखा पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ असे 50 लाखांचा वर माल पकडला आहे. अवैध गुटखा तस्करीचे धाबे दणाणले आहे. यात सफेद पोते 22 व खाकी पोते 115 आहे.
सध्या लाॅकडाऊन असल्याने गुटखा शौकिनांना गुटखा मिळत नसल्याचा फायदा तस्कर पाच रुपयाचे पुढी पन्नास रुपयाला विक्री करीत असल्याचे गुटख्याची सर्वत्र मागणी वाढल्याने गुटखा तस्करी सक्रीय झाली आहे. संबंधित अन्न औषधे विभागाचे अधिकारी यावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नवापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नागपूर सुरत महामार्गावर अवैधरीत्या गुटखा तस्करी करत असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली पोलीसा सापळा रचून महामार्गावरून येणारी ट्रक क्रमांक एम एच 31 सी.बी 8837 तपासणी केली असता 50 लाखांचा रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दिसून आले. चालकाला ताब्यात घेतले पोलीस चौकशी करीत.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली छत्तीसगड रायपूर मधून गुजरात राज्यातील अंकलेश्वर गुटखा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली. मात्र याचा गैरफायदा घेत मोठ्याप्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे असल्याचं समोर आलं आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.