आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:पोषक आहाराअभावी 50 % गर्भवतींना अॅनिमियाचा त्रास

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या खानपानाच्या सवयींमुळे बहुतांश महिलांमध्ये अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून येते. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत असून सुमारे ५० टक्के गर्भवती महिलांना या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिली.

त्यामुळे महिलांनी हिमोग्लोबिनविषयी जागृत राहून पोषक आहाराकडे लक्ष द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नसल्याने त्याचा परिणाम शरीरावर होताे.

भारतात गर्भवती महिलांपैकी ५० टक्के महिलांच्या शरीरात ११ पेक्षा कमी प्रमाणात हिमोग्लोबिन आढळून येत आहे. हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजेच अॅनिमिया असतो. हा तीन प्रकारचा असतो. पहिल्या स्टेजमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ८ ते १० असते. हे गोळ्यांनी नियंत्रणात आणले जाते. दुसऱ्या स्टेजमध्ये ५ ते ८ यामध्ये असते. हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी इंजेक्शन देण्याची गरज भासते.

तर तिसऱ्या स्टेजमध्ये ५ पेक्षा कमी हिमोग्लोबिन होते. यात रक्ताच्या पिशव्या लावाव्या लागतात. यातूनच अनेक समस्या उद्भवतात. विशेष म्हणजे पोषणाच्या अभावाने महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते.

दरम्यान, शहरी भागात जनजागृती असल्याने याठिकाणी महिलांमध्ये १० ते १२ प्रमाण आढळून येते तर ग्रामीण भागातील महिलांच्या शरीरात मात्र हिमोग्लोबिनचे प्रमाण ८ ते ९ आढळून येते. तर आजही २५ महिलांच्या शरीरात ६ पेक्षा कमी हिमोग्लोबिन आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण हाेत आहे.

गूळ, शेंगदाणे, अंजीर, बीट खावे
गर्भवती महिलांनी दरराेज हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गूळ, शेंगदाणे, डाळी, मनुके, नॉन-व्हेज, अंजीर, बीट, पालेभाज्या आहारात समाविष्ट कराव्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्यांचा वापरही करावा.

गर्भवती महिलांनी जागृत राहावे
खानपानाच्या बदलल्या सवयींमुळे शरीरात लोहाची मात्र कमी होते. परिणामी हिमोग्लोबिनची कमतरता आढ‌ळून येते. म्हणून सर्व महिलांनी पोषक आहार घेणे अत्यावश्यक असते. गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची आवश्यकता अधिक असते.आहाराविषयी जागृक रहावे. - डॉ. राधेश्याम चौधरी, स्त्रीरोग तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...