आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने देशातील प्रत्येक दाेन ग्रॅम साेन्याच्या दागिन्यांचा विक्री खरेदी व्यवहार हा हाॅलमार्कने असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक सुवर्ण व्याावसायिकाला हाॅलमार्किंगची नाेंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी सुवर्णनगरी म्हणून देशात आेळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारातील ५० टक्के व्यावसायिकांनी अद्याप हाॅलमार्किंगची नाेंदणी केलेली नाही. दरम्यान, पुढील महिन्यात ही नाेंदणी करण्यात येणार असल्याचे शहर सराफ असाेसिएशनचे म्हणणे आहे.
भारतीय मानक ब्युराेतर्फे (बीआयएस) दाेन महिन्यांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यात साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास सुवर्ण व्यावसायिक आहेत. तर शहरात त्यांची संख्या १२५ पेक्षा अधिक आहे. हे व्यावसायिक हाॅलमार्क असलेले साेन्याचे दागिनेच विक्री करतात. परंतु, ते दुसऱ्याकडून घेऊन विक्री करतात. त्यामुळे ते शुध्दच असतात. पण कायद्याने उलाढाल ४० लाखांच्या वर आहे, त्यांनी हाॅलमार्क नाेंदणी करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.