आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलांच्या मागणीत जानेवारीपासून प्रचंड वाढ हाेते. त्यात सर्वाधिक भाव खाताे ताे म्हणजे गुलाब. शहरातील फुलांच्या बाजारात दरराेज वेगवेगळ्या प्रकारची फुले येतात. साेबतच आता फुलांची झाडेही दाखल हाेत आहेत. शहरातील विविध राेपवाटीकांत यंदा ५० ते ६० प्रकारांच्या विविध गुलाबांची राेपटी दाखल झाली आहेत. प्रियजनांना या गुलाबांची रंगानुसार वेगवेगळी राेपटी देण्याचा ट्रेंड रूजताे आहे. शहरात तब्बल ८ ते १० ट्रक गुलाब राेपाची कोलकात्यातून आवक झाली आहे. विविध फुल झाडांमध्ये गुलाबाची मागणी विशेष असून विक्रेत्यांनी व्हॅलेंटाईन-डेच्या पार्श्वभूमीवर अधिक झाडे मागवली आहेत.
परंतु, घरगुती भेटवस्तुंतही ग्राहकांकडून गुलाबाला अधिक पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा, जांभळा, केशरी, बहुरंगी या प्रमुख रंगासाेबतच वेली, हायब्रीड टी, फ्लाेरिबंडा, मिनिएंचर्स आदी प्रकारात गुलाबाची राेपटी उपलब्ध आहेत. देशी आणि विलायती या प्रकारात देखील गुलाबात अनेक जातींचे गुलाब उपलब्ध आहेत. लाल रंगामध्ये पापा मिलांद, सोफिया लॉरेन्स, ७ ते १० प्रकारचे गुलाब आहेत. गुलाबी रंगात मारिया, मृणालिनीसह पाच प्रकारच्या फुलांच्या जाती उपलब्ध आहेत.
गुलाबाचे दर स्थिर
गुलाबाची राेपटी त्यांचे प्रकार आणि आकारमानानुसार उपलब्ध आहेत. जवळपास ३० रूपयांपासून तर ७० रूपयांपर्यंत राेपटी उपलब्ध आहेत. तर काही माेठी राेपटी १०० रूपयांपेक्षा अधिक दराने विक्री हाेत आहे. राेपांसाेबत गुलाबासाठी आवश्यक असलेली माती, खते, कुंड्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्यांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
वर्षातून दाेन वेळा मागणी
जुन-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुलांच्या राेपांना अधिक मागणी असते. यावर्षी कलकत्त्याहून विविध प्रकारचे गुलाब मागवले आहेत. गुलाबात जवळपास ५० ते ६० प्रकारची राेपटी उपलब्ध आहेत. -कुर्बान अली खान, राेपवाटीका चालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.