आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या जवखेडा येथे सापडले 51 वीजचोर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी ज्या जवखेड्यात वीजचोरी पकडणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती; त्याच गावात मंगळवारी वीज चोरी विरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत गावातील सर्व वीज कनेक्शनची तपासणी करण्यात आली. यात एकूण ५१ घरांमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेण्यात आला होता.

वीज चोरीच्या मोहिमेत वीजचोरी पकडण्यासोबतच गावातील जुन्या वीजतारा काढून नवीन एरियल बंच केबल टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले. केबल टाकण्यासंदर्भात काही भागातील काम झाले असून उर्वरित काम येत्या २ ते ३ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे गावातील तसेच परिसरातील वीजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

वीज चोरीची ही मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल उपविभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी राबवली. यात एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता पी. एस. महाजन, कासोदा कक्षाचे सहायक अभियंता राहुल पाटील, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, पिंपळकोठा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील, सर्व जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...