आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी कायम:साेने जीएसटीसहीत 55 हजारांवर; लग्नसराई, आंतरराष्ट्रीय घडामाेडींचा परिणाम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशी विवाहानंतर सगळीकडे विवाह साेहळ्यांची धूम आहे. दुसरीकडे साेन्याचे दर वाढत असून ही दरवाढ आता ५३ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊन पाेहाेचली. गुरुवारी जळगाव सराफा बाजारात हे दर जीएसटीसह (३ टक्के) ५५ हजार १०० रुपयांवर पाेहाेचले. हेच दर गेल्या चार महिन्यातील उच्चांकी आहे.विशेष म्हणजे दर वाढले असले तरी लग्नसराईमुळे साेन्याच्या दागिन्यांना मात्र मागणी कायम आहे.

सन २०२०मध्ये काेराेना काळात लाॅकडाऊनमध्ये साेन्याचे दर ५५ हजारांवर पाेहाेचले हाेते. त्यानंतर दीड वर्ष हे दर ५० हजारांच्या आसपास स्थिर हाेते. मात्र, तीन महिन्यांपासून दरवाढ सुरू झाली. साेन्याचे दर वाढत असले तरी लग्नसराईमुळे दागिन्यांची मागणी कायम आहे. चांदीचे दर मात्र काेविड काळातील दराची तुलना करता चांदीचे दर मात्र कमी आहेत असे शहर सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले.

तर युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध लांबल्याने विविध देशांकडून भविष्याचा वेध घेऊन साेन्याची खरेदी हाेते आहे. हे आंतरराष्ट्रीय कारण व लग्नसराईमुळे साेन्याची मागणी कायम आहे. या मुळे साेन्याच्या दरात वाढ हाेत आहे असे जिल्हा सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष गाैतम लुणिया म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...