आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफाेडी:निवृत्तीनगर परिसरात 56  हजारांची घरफाेडी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्तीनगरातील देवेंद्रसिंग चंद्रसिंग जाधव हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातून चाेरट्यांनी ५६ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लंपास केले. व्यवसायाने पुस्तक विक्रेते असलेले देवेंद्रसिंग हे कल्याणेहाेळ (ता.धरणगाव) येथे २८ आॅक्टाेबर ते ४ नाेव्हेंबर दरम्यान गेले हाेते.

या दरम्यान त्यांच्या घरातून साेन्याचे झुंबर, साेन्याचे काप, अंगठी, नथ, चांदीच्या साकळ्या असा एकूण ५६ हजार १०० रुपयांचा एेवज चाेरट्यांनी लंपास केला. तपास हेडकाॅन्स्टेबल मनाेज पवार हे करीत आहेत. शहरात दिवाळीच्या सुटीमुळे अनेक नागरिक बाहेरगावी गेले आहे. ही संधी साधून चाेरटे चाेरी करीत आहे. त्यामुळे पाेलिस गस्त वाढवण्याची मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...