आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनो जरा जपून:मुक्ताईनगर तालुक्यात 56 हजारांचे अनाधिकृत कापुस बियाणे जप्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाची मान्यता नसलेले व विक्रीला बंदी असलेले अनाधिकृत एचटीबीटी कापुस बियाण्यांची विक्री हाेत असलेले 56 हजार 700 रुपये किंमतीचे 66 पाकीट कृषि विभागातर्फे सापळा रचून जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुक्ताईनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात मध्यप्रदेश लगतच्या तालुक्यात माेठ्या प्रमाणावर हाेणाऱ्या अनाधिकृत बियाणे विक्री राेखण्यासाठी कृषि विभागातर्फे 16 भरारी तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक संभाजी ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली माहिम अधिकारी विजय पवार यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील मे. श्री. साई राम अॅग्राे एजन्सी या केंद्राची तपासणी केली असता विक्रीस बंदी असलेले एचटीबीटी कापुस बियाण्याचे सहा पाकीट आणि मे. अंकुर सिडस्, नागपुर या कंपनीचे स्वदेशी-5 हे देशी वाणाचे बनावट बियाणाचे 60 असे 66 पाकीट आढळून आले.

सापळा रचून कारवाई

अनाधिकृत बियाणे तपासणीसाठी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, मुक्ताईनगर तालुका कृषि अधिकारी अनिव माळी व पंचायत समितीचे कृषि अधिकारी सुनिल माेरे यांच्या सहकार्याने साफळा रचून पाकीट जप्त करण्यात आलेत. याबाबत केंद्र चालक प्रदिप शामराव पाटील व गाेपाळ वामन जवरे यांच्या विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार मुक्ताईनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषि विभागाचे आवाहन

खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांनी बनावट तसेच अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे, अवैधरित्या व विना बिलाने खरेदी करू नये. तसेच या बियाण्यांची काेणत्याही परिस्थित लागवड करून नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषि वभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...