आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा कोरोना:दोन्ही कोरोना बाधितांच्या जवळीकांचे 58 रिपोर्ट निगेटिव्ह ,नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बदनामी केल्या प्रकरणाचा मोर्चे काढून जाब विचारला जाणार - गोरसेना

जिल्ह्यात दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली आहेत. जिल्हा प्रशासनाने दोन्ही कोरोना बाधित रुग्णांच्या जवळीक असलेल्या 58 जणांचे स्त्राव घेतले असता, ते रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील 35 वर्षीय मृतक महिला व वाशिम जिल्ह्यातील कवठळ येथील 65 वर्षीय वृद्ध कोरोना बाधित असल्याचे,निष्पन्न झाले आहे. दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, प्रशासनाने खबरदारी घेत जिल्ह्यात दोन दिवसीय लॉकडाऊन करण्यात आले. संपर्कात असलेल्यांचे 41 अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर उपविभागीय यांच्या आदेशानुसार इतर तालुक्यात शिथिलता देण्यात आली तर आर्वी तालुक्यात लॉकडाऊन सुरु ठेवण्यात आले होते. 13 मे रोजी मृतक महिला यांच्या घरातील सदस्य पती,मुले व इतर जवळीक असलेल्यांचे व वाशिम येथील रुग्णांच्या घरातील सदस्य मुले, सासू व वाहन चालक व यांच्या सह रुग्णालयातील स्टॉप यांचे 58 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे बाजारपेठ मध्ये दिसून आले आहे.

 दोन रुग्ण कोराना बाधित आढळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण

मृतक महिलेच्या अंत्यसंस्कार दरम्यान तीनशे नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढणार असल्याच्या उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. सर्वाना विलगिकरण कक्षा मध्ये तर गृह विलगिकरणा मध्ये ठेवण्यात आले होते.

 बदनामी केल्या प्रकरणाचा मोर्चे काढून जाब विचारला जाणार - गोरसेना

प्रशासनाने खोटी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहेत.महिला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करीत नव्हती,मृतक महिलेला कोरोनाचे लक्षणे दिसतात आर्वी येथील डॉक्टरांनी तिला सावंगी रुग्णालयात का पाठविले, तीच्यावर त्याच ठिकाणी उपचार का केले नाहीत.मृतकाच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा संपुष्टात आल्यानंतर गोरसेना जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मोर्चे काढून निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गोरसेना ज्ञानेश्वर राठोड तसेच देवळी, मोई, हिवरा, हराशी,बोथली, गव्हानखेडी, टेकडी, दहेगाव मुस्तफा, पाचोड येथील गोर सैनिक यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...