आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:जगदंबा मातेची यात्रोत्सवानिमित्त 6  राेजी महापूजा‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश व विदर्भाच्या सीमेवरील पिंपळगाव देवी‎ येथे सालाबादप्रमाणे जगदंबा मातेचा यात्रोत्सव‎ येत्या पौष शुद्ध पौर्णिमेपासून (दि.६) सुरू होईल.‎ २१ जानेवारीपर्यंत पंधरा दिवस हा उत्सव चालतो. ६ ‎ ‎ जानेवारीला सकाळी १० वाजता मंदिर संस्थानच्या ‎ ‎ विश्वस्तांकडून जगदंबा मातेची महापूजा होईल.‎ नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.‎ कोरोना काळात दोन वर्षे हा यात्रोत्सव‎ भरवण्यात आला नव्हता. यंदा कोणतेही निर्बंध‎ नसल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. त्याची तयारी‎ आतापासूनच सुरू आहे.

यात्रेत गुळाची जिलेबी व‎ रेवड्या अत्यंत प्रसिद्ध असल्याने प्रत्येक यात्रेकरू‎ त्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय जात नाही.‎भाविकांची गैरसोय टाळण्यावर भर‎ दोन वर्षांनंतर पूर्वीच्या उत्साहात यात्रा भरणार‎ आहे. त्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची‎ गैरसोय टळावी यासाठी नियोजन सुरू आहे.‎ शिवाय मंदिर व परिसरात साफसफाई, रंगरंगोटी‎ करण्यात येईल.

मंदिरावर आकर्षक विद्युत‎ रोषणाई देखील होणार आहे. खेड्यापाड्यातील‎ भाविकांना दर्शन घेणे सोयीचे व्हावे यासाठी‎ परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात‎ येतील. यात्राेत्सवात अनुचित प्रकार‎ टाळण्यासाठी मोताळा पोलिस बंदोबस्त ठेवणार‎ असल्याचे आयाेजकांनी कळवले आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...