आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२० कोटींचे अनुदान:राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानामध्ये ६० टक्के वाढ

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाकडून आता ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे १२० कोटींचे अनुदान ३०० कोटींपर्यंत वाढेल. यातून वाचनालयांना स्पर्धा परिक्षार्थींसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करता येतील. युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी देखील ग्रंथालयांना उपक्रम सुरू करता येतील यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अनुदान वाढीच्या घाेषणेमुळे वर्षानुवर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १२ हजार ५०० ग्रंथालयांना दिलासा मिळाला आहे. ग्रंथालये डिजिटलाइज व्हावीत यासाठी ग्रंथालयांना आर्थिक पाठबळ हवे हाेते. ग्रंथालयांना पुनरुज्जीवित करण्यासाठी थेट विधानसभेतच प्रश्न उपस्थित झाला हाेता. दरम्यान, राज्यात जिल्हा, तालुकास्तरावर अ, ब, क, ड अशा ४ श्रेणीत ग्रंथालये आहेत. त्यांना ३० हजारांपासून ते ७ लाख २० हजारांपर्यंत अनुदान दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...