आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:108 जीर्ण इमारतींमध्ये राहतात 600 कुटुंबीय; पावसाळ्यात कोसळण्याचा धोका वाढला

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात जुन्या व धोकेदायक इमारती काेसळून जीवितहानी झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत; परंतु त्यानंतरही पडक्या इमारतींमधील रहिवास कायम आहे. जळगावात महापालिका प्रशासनाकडून दरवर्षाप्रमाणे यंदाही १०८ इमारती धोकेदायक असल्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत; परंतु ही केवळ आैपचारिकता असून, मालक व भाडेकरू यांच्यातील अंतर्गत वादामुळे रहिवासात बदल होत नसल्याची स्थिती आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरातील पडक्या घरांसंदर्भात जाहीर नोटीस देऊन संबंधिताना सतर्क केले जाते.

आर्थिक वादातून दुर्लक्ष
शहरातील १०८ इमारतींत ६००पेक्षा जास्त रहिवासी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या इमारतींमधील रहिवाशांत भाडेकरूंचे प्रमाण अधिक आहे. इमारत मालक व भाडेकरू यांच्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वादामुळे त्या ठिकाणी रहिवास कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...