आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेचा इंडेक्स:दिवाळीत मुंबईपेक्षा औरंगाबादेत 62% तर नाशिकमध्ये 38% अधिक प्रदूषण

प्रदीप राजपूत | जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादच्या हवेचा इंडेक्स राज्यात सर्वाधिक ३२६ च्या धाेक्याच्या पातळीवर

यंदाच्या दिवाळीत औरंगाबाद शहरामध्ये वायू प्रदूषणाची पातळी धाेक्याच्या पातळीवर हाेती. २२ ते २५ ऑक्टाेबर या चार दिवसांमध्ये औरंगाबादेत मुंबईच्या दुप्पट म्हणजे ६२ टक्के अधिक धूलिकणांचे प्रदूषण हाेते. तर नाशिकमध्ये मुंबईच्या तुलनेत ३८ टक्के अधिक प्रदूषण हाेते. श्वसनाद्वारे शरीरात सहज प्रवेश करू शकतील अशा १० मायक्राॅनपेक्षाही अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण औरंगाबादमध्ये ३७१ मायक्राेग्रॅम प्रतिक्युबिक मीटर तर नाशिकमध्ये २२३ च्या पातळीवर हाेते.

दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे वातावरणात अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढते. यंदा मुंबई-पुण्याच्या तुलनेत औरंगाबाद आणि नाशिक या झपाट्याने विकसित हाेणाऱ्या शहरांमध्ये हे प्रमाण अधिक वाढल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या नाेंदीवरून दिसून येते. या दाेन्ही शहरांच्या तुलनेत मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये दिवाळीतील प्रदूषण १५० च्या पातळीपुढे गेले नाही. नाशिकने २०० ची तर औरंगाबादने ३५० ची पातळी आेलांडल्याची धक्कादायक बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाेंदीवरून दिसून आली.

दिवाळीतील प्रदूषणाच्या प्रमाणात औरंगाबादच्या तुलनेत मुंबईसारखे शहर अर्ध्यातदेखील नाही. दिवाळीत यंदा मुंबईमध्ये धूलिकणांचे प्रमाण १११ या उच्चांकी पातळीवर पोहोचले हाेते, तर औरंगाबादचे प्रमाण ३७१ च्या धाेकादायक पातळीवर हाेते. हृदयराेगी, फुफ्फुस विकाराचे रुग्ण, वृद्ध, लहान मुले, दम्यासारखे श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी धूलिकणांचे हवेतील प्रमाण १०० पुढे जाणे धाेक्याचे मानले जाते. नागपूरमध्ये मात्र अन्य प्रमुख शहरांच्या तुलनेत धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक कमी १३० च्या पातळीवर हाेते.

पुण्यात दिवाळीपूर्वी अधिक प्रदूषण
पुण्यात दिवाळीच्या दाेन दिवस आधी अधिक प्रदूषण हाेते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दाेन्ही शहरांत २२ ऑक्टाेबरला धूलिकणांचे प्रमाण ३०७ च्या उच्चांकी पातळीवर हाेते. २३ तारखेला १०७ आणि दिवाळीच्या दिवशी २४ ऑक्टाेबरला १२३ वर हाेते. दिवाळीत पुण्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने २५ ऑक्टाेबरला मात्र केवळ ७१ च्या पातळीपर्यंत खाली आले हाेेते. त्यात थेट दिवाळीनंतर ३१ ऑक्टाेबर राेजी १०४ पर्यंत वाढ झाली आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स धाेक्याच्या पातळीवर हवेतील धूलिकणांचे आरएसपीएम आणि एसपीएम असे वर्गीकरण करून हवेतील इतर घटकांचा एकत्रित एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) जाहीर केला जाताे. त्यात औरंगाबाद शहरातील दिवाळी काळातील आयएक्यू धाेक्याच्या पातळीवर हाेता.

दिवाळीत असे हाेते धूलिकणांचे प्रमाण
औरंगाबाद ३७१
नाशिक २२३
नवी मुंबई १७७
पुणे १२३
मुंबई १११

बातम्या आणखी आहेत...