आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:महापालिकेच्या साैरऊर्जा प्रकल्पातून दर महिन्याला 62 हजार युनिट वीजनिर्मिती

जळगाव / चरणसिंग पाटीलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वमालकीचा पहिला साैरऊर्जा प्रकल्प महिनाभरात जळगावात कार्यान्वित हाेईल. अमृत अभियानांतर्गत महापालिकेने वाघूर राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्राजवळ ३५० आणि १५० केव्ही क्षमतेचे दाेन साैरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. त्यातून महिन्याला ६२ हजार युनिट वीजनिर्मिती हाेईल. दाेन्ही ठिकाणच्या वीजनिर्मितीतून पाणीपुरवठ्यावर हाेणाऱ्या खर्चात वर्षाला ५० लाख रुपयांची बचत हाेईल.

अमृत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा याेजनेंतर्गत राज्य शासनाने साैरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली हाेती. त्यासाठी अडीच काेटी रुपये खर्चाची तरतूद केली हाेती. फ्रेयर एनर्जी सर्व्हिसेस प्रा.लि. या एजन्सीमार्फत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले प्रकल्प उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. क्युबिकल टेस्टिंगचे काम सुरू आहे. सुरुवातीला १५० केव्ही प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू हाेईल. त्यानंतर पंधरा दिवसांनी ३५० केव्हीचा प्रकल्प कार्यान्वित हाेईल.

तर पाच वर्षांत खर्च वसूल हाेईल राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्रावरील ३५० केव्ही व १५० केव्ही प्रकल्प उभारणीचे कार्यादेश फ्रेयर एनर्जी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दिले आहेत. एका दिवसाला सुमारे २ हजार युनिट विजेचे उत्पादन हाेईल. महिन्याला ६२ हजार ५०० युनिट वीज मिळेल. एका युनिटचा सरासरी ७ रुपये खर्च गृहीत धरला तरी महिन्याला ४ लाख ३७ हजार रुपयांची वीजबिलात बचत हाेईल. हाच आकडा वर्षभरासाठी ५२ लाख ५० हजार हाेईल. प्रत्यक्ष दाेन्ही प्रकल्पांसाठी अडीच काेटी रुपये झालेला खर्च पाच वर्षांमध्ये वसूल हाेणार आहे. कारण पाच वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एजन्सीवर साेपवली आहे.

दाेन्ही ठिकाणचा वीज वापर असा वाघूर धरणातून पाणी उपसा करण्यासाठी राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनसाठी दर महिन्याला सरासरी ९ लाख ९० हजार युनिट वीज लागते. त्यापाेटी सरासरी ८३ लाख ९८ हजार रुपयांचे वीजबिल अदा करावे लागते. तर उमाळा जलशुद्धीकरण केंद्रासाठी दर महिन्याला सरासरी ३३ हजार युनिट वीज वापर हाेताे. त्यासाठी सुमारे ३ लाख ९ हजार वीज बिलावर खर्च हाेताे. दाेन्ही ठिकाणी मिळून महिन्याला १० लाख २३ हजार युनिट वीज लागते.

उत्पादित झालेली वीज ग्रीडमध्ये जमा हाेईल नेट मीटर प्रणालीत प्रकल्पातून निर्माण केलेल्या विजेचा वापर न झाल्यास महावितरणच्या ग्रीडमध्ये दिली जाते. ज्या वेळेला महावितरणच्या ग्रीडमधून वीज घेतली जाईल त्या वेळेला जास्त झालेली वीज वजा करून बिलाची आकारणी हाेत असते. अर्थात, मनपाच्या पाणीपुरवठ्याचय्ा येणाऱ्या बिलाच बचत हाेणार आहे.

अंतिम जाेडणीचे काम महिन्याभरात पूर्ण हाेणार मनपाच्या पाणीपुरवठा याेजनेसाठी ३५० केव्ही व १५० केव्हीच्या साैरऊर्जा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. महावितरणकडून अंतिम जाेडणीचे काम झाल्यानंतर महिनाभरात वीजनिर्मिती सुरू हाेईल. यामुळे मनपाच्या वीजबिलाच्या खर्चात दिलासा मिळेल. - शिवाजी बाेडके, जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा

बातम्या आणखी आहेत...