आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:तांबापुरात बंद घर फोडून 68 हजारांचा ऐवज लांबवला ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईला गेलेल्या एका कुटंुबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ६८५०० रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना १९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. मज्जिदशाह हसनशाह फकीर (वय ५१, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. फकीर हे १४ रोजी कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-काेयंडा तोडून घरातील दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. १९ रोजी कुटंुबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...