आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या ६ वर्षांत भारतातून झालेल्या १३,९०१ कोटींच्या मद्य निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ५०% असून ६,८२४ काेटींचे मद्य राज्यातून निर्यात झाले. यात दुसऱ्या स्थानावरील गुजरातचा वाटा केवळ ३.५८%-४९९ काेटी आहे. गेल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रातून मद्य निर्यातीचे प्रमाण ५५ टक्यांवर पोहचले असून गुजरात, पंजाब, उप्रसह १५ राज्यांचा एकत्रित वाटा अवघा ४५ टक्के आहे. उर्वरित. पान ६
महाराष्ट्र आघाडीवर
दरवर्षी अल्कोहाेलयुक्त पेयांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ५० ते ६० टक्क्यांदरम्यान राहिला आहे.
गुजरातमध्ये सुधारणा
- सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात गुजरातने केवळ १२ कोटी रुपयांचे अल्कोहाेलयुक्त पेय निर्यात केले हाेते. { काेराेनानंतर मागील वर्षी २०२१- २२ मध्ये २०५ काेटी रुपये, तर एप्रिलपासून गेल्या नऊ महिन्यांमध्ये १६६ काेटी रुपयांची निर्यात करत गुजरात राज्य दुसऱ्या क्रमाकांवर आले आहे.
बिअर, वाइन, व्हिस्की आणि रमचा समावेश
एप्रिल २०२२ पासून देशातून १२१४२७.३४ मे. टन मद्यनिर्यात झाली. त्यात महाराष्ट्रातून बिअर, वाइन, व्हिस्की, रम अशा पेयांची ७६९०७.६ मे. टन निर्यात अरब अमिराती, सिंगापूर, अमेरिका, घाना, हैती व अंगाेला अशा देशांमध्ये करण्यात आली आहे.
वायनरी आणि डिस्टीलरींमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक अल्काेहाेलिक पेयांची निर्मिती हाेते. सन २०१६ पासून डिसेंबर २०२२ पर्यंत गेल्या सहा वर्षांत देशातून १३,९०१.५८ काेटी रुपयांचे अल्काेहाेलिक पेय निर्यात झाले आहे. त्यात ५० टक्के ६,८२३.७७ काेटी रुपयांचा वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. या निर्यातीत दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरातचा वाटा ३.५८ टक्केच असून ही रक्कम ४९९.९७ काेटी असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आली.
निर्यात होणाऱ्या बाबींत टाॅप-२० मध्ये मद्य
भारतातून निर्यात हाेणाऱ्या प्रमुख बाबींमध्ये प्रमुख २० बाबींत अल्काेहाेलिक पेयांचा समावेश आहे. भारतातून तांदुळ, मांस, गहू यांची सर्वाधिक निर्यात हाेते. त्यानंतर मका, पशुखाद्य, भाजीपाला, फळे, कांदे, डेअरी प्राॅडक्ट यांच्यासाेबत अल्काेहाेलिक पेयांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.