आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात रेडक्रॉस संस्थेतर्फे 693 पिशव्या रक्त संकलन

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे रक्तदात्यांचा उत्साह ऑगस्ट महिन्यात अत्यंत विक्रमी ठरला. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५व्या अमृत महोत्सवानिमित्ताने रक्तदात्यांमध्ये संचारलेला देशभक्तीचा उत्साह रक्तदानाच्या माध्यमातून दिसून आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या स्वातंत्र्य दिन महोत्सवात रक्तदात्यांच्या संख्येत चार पटीने वाढ झाली. रेडक्राॅसने ६९३ पिशव्या रक्तसंकलनाचा उच्चांक केला. जळगाव शहरातील विविध संस्था संघटनांकडून यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उत्सवात रक्तदानावर अधिक भर दिला गेल्याचे दिसून आले.

त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसंकलनाचे प्रमाणही स्वातंत्र उत्सवाच्या चार दिवसांत नेहमीपेक्षा चारपटीने जास्त होते. रेडक्रॉस, गोळवलकरसह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांशी संपर्क साधला असता ही माहिती समोर आली. यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षाच्या उत्सवामुळे स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिर आयोजनाचे प्रमाण अधिक होते. यासह रक्तदात्यांनीही रक्तदान करून देशभक्तीचा जागर केल्याचे रेडक्रॉस सोसायटीचे उज्ज्वला वर्मा यांनी सांगितले. केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित गोळवलकर रक्तपेढीचे जगदीश शाह यांनीही यावर्षी ग्रामीण भागातून चांगला रक्तसंकलनास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयानेही बोदवड, पारोळा या ठिकाणी रक्तदान शिबिरे झाली असल्याची माहिती दिली.

या रक्तगटांचा तुटवडा
रक्तपेढ्यांमध्ये ‘ओ निगेटिव्ह’, ‘एबी निगेटिव्ह’ या गटाचा तुटवडा आहे. रुग्णांसाठी गरजेवेळी अन्य रक्तपेढ्यामधून संकलन करून गरज भागवावी लागते. वारंवार आवाहन करावे लागते. अन्य रक्तगटाचा पुरेसा रक्तसाठा जळगावात उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...