आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम डिझाइन:भाेईटे नगर उड‌्डाणपुलासाठी 7 काेटींचा भूसंपादन प्रस्ताव

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेईटे नगराजवळ रेल्वेगेटवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. पिंप्राळाकडे जाण्यासाठी या पुलावरून ‘आर्म’तयार केला जात आहे. यासाठी पाच प्लाॅट बाधीत हाेणार आहेत. त्यासाठी महापालिकेने सुमारे सात काेटी रूपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव तयार केला असून साेमवारी दाखल केला जाणार आहे.

शहरातून जाणाऱ्या रिंगराेडला जाेडणाऱ्या उड‌्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. शिवाजीनगरकडील भागात काॅलम उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर रिंगराेडच्या बाजुने नवीन काॅलम टाकण्यात येताे आहे. १८ महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या पुलावरून पिंप्राळासह शेकडाे काॅलन्यांमधील नागरीकांना वाहतुकीसाठी आर्मची निर्मीती केली जाते आहे. अनेकदा डिझाइनमध्ये बदल झाल्यानंतर अ‌खेर महारेलने अंतिम डिझाइन तयार करत कामाला सुरूवात केली आहे. यात पाच प्लाॅट बाधित हाेणार आहेत. त्या जागांच्या भूसंपादनासाठी वाटाघाटीनंतर जवळपास सात काेटी रूपये निश्चित केले आहेत. यासाठीचा प्रस्ताव साेमवारी सादर केला जाणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामात आता काेणताही अडथळा राहिलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...