आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन नोंदणी:29 कॉलेजात पॉलिटेक्निकच्या 7 हजार 482 जागा उपलब्ध ; 30 जूनपर्यंत करता येणार ऑनलाइन नोंदणी

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आयटीआयच्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. याद्वारे पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, यंदा खान्देशात पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी २९ महाविद्यालयात ७ हजार ४८२ जागा उपलब्ध आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया (ऑनलाइन पोर्टल) सुरू झाली असून दहावीच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. दहावीच्या निकालानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. दरम्यान पाॅलिटेक्निक डिप्लोमानंतर नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. तसेच पदवीच्या थेट द्वितीय वर्षालाही प्रवेश मिळत असतो. दहावीनंतर अनेक विद्यार्थी आयटीआय करतात. त्यामुळे नवीन नियमामुळे आता आयटीआय झालेले विद्यार्थीही तंत्रशिक्षणाला प्रवेश घेऊन डिप्लोमा किंवा डिग्रीचे शिक्षण घेऊ शकतील.

यंदापासून कोणताही ट्रेड घेऊन दहावीनंतरच्या आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळेल. थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर डिप्लोमा पूर्ण करून या विद्यार्थ्यांना डिग्रीच्या अर्थात बी. ई.च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...