आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या यशस्वीरीत्या प्रसूती:शासकीय रुग्णालयात आधुनिक सामग्रींमुळे ७० टक्के प्रसूती होऊ लागल्यात ‘नाॅर्मल’

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ ३० टक्केच महिलांच्या प्रसूती हाेतात सिझेरियनद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह ग्रामीण भागात असलेल्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी सुविधा करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मॉड्यूलर ओटू रूम व अत्याधुनिक सुविधेमुळे महिलांच्या यशस्वीरीत्या प्रसूती होत आहेत. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयात ७० टक्के प्रसूती नॉर्मल पद्धतीने होत असल्याने महिला रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या चार वर्षांत १९ हजार महिलांची नॉर्मल प्रसूती झाली आहे.

नॉर्मल प्रसूती सिझेरियन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार वर्षांत प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. सुमारे २४ हजार ७०२ महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक १९ हजार प्रसूती नॉर्मल झाल्या आहेत तर ५६९९ महिलांचे सिझेरियन झाले आहे. पूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सिझेरियनसाठी गर्भवती महिलांना शहरात जिल्हा रुग्णालयात यावे लागत असे. मात्र याठिकाणी पोहाेचत असताना अनेकदा महिलांना जीव गमवावा लागला तर काही वेळा बाळ दगावले. यावर तोडगा म्हणून ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

चोपड्याच्या महिलेने दिला तिळ्यांना जन्म
शासकीय वैद्यकीय महाविद्या-लय व रुग्णालयात मंगळवारी चोपडा तालुक्यातील एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला.त्यात दोन मुले, एक मुलगी आहे. या बाळांसह महिलेची सुखरूप प्रसूती झाली आहे

बातम्या आणखी आहेत...