आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:खान्देशात 29 महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या 7 हजार जागा उपलब्ध, 30 जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पाॅलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे आयटीआयच्या सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. याद्वारे पाॅलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान यंदा खान्देशात पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी 29 महाविद्यालयात 7 हजार 482 जागा उपलब्ध आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया (ऑनलाइन पोर्टल ) सुरू झाली असून दहावीच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येईल. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 2 जूनपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. दहावीच्या निकालानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. दरम्यान पाॅलिटेक्निक डिप्लोमानंतर नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. तसेच पदवीच्या थेट द्वितीय वर्षालाही प्रवेश मिळत असतो. दहावीनंतर अनेक विद्यार्थी आयटीआय करतात. त्यामुळे नवीन नियमामुळे आता आयटीआय झालेले विद्यार्थीही तंत्रशिक्षणाला प्रवेश घेऊन डिप्लोमा किंवा डिग्रीचे उच्च शिक्षण घेऊ शकतील

अशी आहे प्रवेशाची स्थिती

जिल्हा - कॉलेज-जागा

जळगाव - 16 - 3 हजार 957

धुळे - 10 - 2 हजार 737

नंदुरबार - 03 - 788

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

2 ते 30 जून - ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदत

3 जुलै - तात्पुरती गुणवत्ता यादी होईल प्रसिद्ध

4 ते 6 जुलै - आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत

7 जुलै - अंतिम गुणवत्ता यादी होईल प्रसिद्ध

बातम्या आणखी आहेत...