आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात लाॅकडाऊनच्या दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास 70 हजाराचा अवैद्य मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दुसरीकडे नवापूर शहरातील शांतीनगर भागात दिनेश गोविंद चौधरी यांच्या घराजवळ अवैद्य दारुचा साठ्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यादरम्यान पोलिस ठाण्यात मद्यसाठा कारवाईचा फोटोसेशन नादात सोशल डिस्टसनचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन केले, तर काहींनी पालन केले नाही. सामाजिक दृष्ट्या दारू जेवढी घातक आहे. तेवढेच सोशल डिस्टसन देखील.
नागपूर सुरत महामार्गाने नवापूर शहरात पांढऱ्या रंगाची स्विप्ट गाडी क्रमांक (GJ 26 A 6400) यात दारुची वाहतुक होत माहिती मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. तिला गावातील साईबाबा मंदीरासमोर अडवुन तिची तपासणी करता त्यात 70 हजार रुपये किंमतीची बियर व गाडीसंह एकुण किंमत 3 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कार चालक सुंदरभाई धेड्या गावीत, (रा. लक्कडकोट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डि. एस. शिंपी हे करीत आहे.
शांतीनगरात दारू विक्रीने अशांती
शनिवारी दुपारच्या सुमारास नवापुर शहरातील शांतीनगर भागातील दिनेश गोविंद चौधरी यांच्या घरात अवैद्य दारुचा साठ्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक धीरज महाजन,कृष्णा पवार, योगेश्वर तनपुरे, दिनेश बावीस्कर,सुरेखा वळवी यांना मिळालेल्या गुप्त माहीतीतील घराची पाहणी केली असता सदर घराचे बाजुस असलेल्या भिंतीलगत वेगवेगळ्या कंपन्यांची देशी विदेशी दारु व बियरचा 55, हजार 913 रुपयांची मद्यसाठा मिळुन आल्याने सदर अवैद्य दारुच्या साठ्यावर कार्यवाही करीत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. असुन पुढील तपास सपोनि/धिरज महाजन हे करीत आहेत.
नवापूर पोलिसांनी केली कारवाई
नवापूर पोलिस ठाण्यातील दोन्ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहा. पो. निरी. दिगंबर शिंपी,धिरज महाजन,कृष्णा पवार,गुमानसिंग पाडवी,प्रविण मोरे,महेश पवार,अल्ताप शेख, आदिनाथ गोसावी,योगेश साळवे, योगेश्वर तनपुरे,जयेश बावीस्कर,दिनेश बावीस्कर, श्याम पेंढारे,पंकज सुर्यवंशी, निशांत गिते, सुरेखा वळवी आदींनी कारवाई केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.