आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक वितरण:आसोदा सर्वोदय एज्युकेशनच्या 74 व्या‎ वर्धापनानिमित्त उद्या पारितोषिक वितरण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ आसोदा येथील सर्वोदय एज्युकेशन‎ सोसायटी संचलित सार्वजनिक‎ विद्यालय व कनिष्ठ‎ महाविद्यालयाचा ७४ वा वर्धापनदिन‎ सोहळा शुक्रवारी साजरा होणार‎ आहे. यानिमित्त सकाळी ८.३०‎ वाजता वार्षिक पारितोषिक‎ वितरणासह विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर‎ जयश्री महाजन ह्या असतील.‎

प्रमुख म्हणून माध्यमिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,‎ ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक‎ दीपक पटवे हे उपस्थित राहणार‎ आहेत. संस्थेचे विद्यार्थी व उद्योजक‎ नितीन महाजन, डॉ. महेंद्र चौधरी,‎ सुनील चौधरी, सहायक पोलिस‎ निरीक्षक योगिता नारखेडे, सागर‎ नाथ यांचा सन्मान केला जाणार‎ आहे. सार्वजनिक विद्यालय व‎ कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ अाजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभागी‎ व्हावे, असे संस्थेचे अध्यक्ष विलास‎ चौधरी, सचिव कमळाकर‎ सावदेकर, चेअरमन उद्धव पाटील,‎ मुख्याध्यापक विद्या खाचणे व‎ शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर‎ कर्मचारी यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...