आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळी लवकर उठून मुलांसाठी डबा तयार करणे त्यासोबतच बॅग, वॉटर बॅग देऊन मुलांची तयारी करण्यात आई व्यस्त होती तर दुसरीकडे दोन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांची लगबग सुरू होती. मात्र, दोन वर्षांच्या खंडानंतर सलग पाच तास शाळेत थांबावे लागणार या विचाराने विद्यार्थ्यांत नाराजी दिसून आली. उत्साहाने घरातून गेलेली मुले शाळेत पोहोचताच रडू लागली. विशेष म्हणजे पालकांचा निरोप घेताना चक्क इयत्ता तिसरी आणि चौथीची मुले हमसून हमसून रडताना दिसून आली.
कोविड व उन्हाळी सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने बुधवारी जिल्ह्यातील ३४०५ शाळांमध्ये जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेच्या शैक्षणिक वर्षास सोमवारपासून सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष विद्यार्थी येण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. सर्व मुले एकाच वेळी शाळेत येणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे म्हणून वर्ग सजावट करण्यात आली होती. यासोबतच शाळांमध्ये फुगे व पताकांची सजावट केली होती. वर्गात व वर्गाबाहेर असलेल्या फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहिण्यात आले होते. सर्वत्र किलबिलाट ऐकायला मिळाला. अनेक शाळांमध्ये फुलांच्या पायघड्या, औक्षण, गुलाबपुष्प देत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये ७५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पालकांनीही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गर्दी केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चमूने बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
नवीन पाठ्यपुस्तके मिळाली : स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा आणि शासकीय शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तके देण्यात येतात. यंदा जळगाव जिल्ह्यातील २७५० शाळांमध्ये ४ लाख १६ हजार ४६२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले. बालभारतीकडून जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांना २४ लाख ६ हजार ६७७ पाठ्यपुस्तके देण्यात आली.
दोन वर्षांनंतर शिजला पोषण आहार : कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत होता. मात्र शाळा नियमित सुरू झाल्याने बुधवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्यात आले. काही शाळांमध्ये गोड पदार्थ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील २ हजार ७५३ शाळांमध्ये पोषण आहार देण्यात आला असून ४ लाख ५१ हजार ८६५ लाभार्थी संख्या आहे. त्यात पहिली ते ५ वीचे २ लाख ७४ हजार ९७७ तर इयत्ता ६ वी ते ८ वीचे १ लाख ७६ हजार ८८८ लाभार्थी आहेत.१८६५ शाळांमध्ये विद्यार्थी गणवेशाच्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.