आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छंद हा आगळाच!:75 वर्षीय रमेश बारींनी लिहिली सेलीब्रेटींना 17000 पत्र, जपान, इंग्लड, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून दखल

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिनेअभिनेता, धर्मगुरूंकडूनही पत्राची दखल

मोबाईल, व्हाॅटसअ‌ॅपसह सोशल मीडियाच्या जमान्यात पत्र व्यवहार दुर्मीळ होत आहे. परंतु, शहरातील ज्ञानदेव नगरातील 75 वर्षीय रमेश आनंदा बारी यांनी आपल्या छंदातून पत्रलेखन ही कला टिकवून ठेवली. 50 वर्षाच्या काळात 17 हजारापेक्षा अधिक पत्र लिहीण्याचा छंद आजही कायम आहे. देशातील नामवंत व्यक्तींसह जपान, अमेरिका, इंग्लडमधील राष्ट्राध्यक्षांसह धर्मगुरू, सिनेकलावंत सेलीब्रेटींनी त्यांच्या पत्राची दखल घेत, त्या पत्रांना उत्तरे दिली आहे. आजही त्यांच्याकडे हजारो पत्रांचा संग्रह कायम आहे.

दुतावासामार्फत सातासमुद्रापार

नववी पर्यंतचे शिक्षण घेतलेले रमेश बारी हे प्रिटींगप्रेसच्या व्यवसायात कार्यरत आहेत. मात्र, पत्रव्यवहाराच्या छंदापासून ते आजही वेगळे झालेले नाहीत. प्रासंगिक, वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, सात्वंन याविषयावर त्यांचे पत्रलेखन, विविध वर्तमानपत्रांमधून मान्यवरांचे कार्य जाणून घेत, मराठी, हिंदी प्रसंगी इंग्रजीमधून ते दिल्ली येथील राजकीय दूतावासामार्फेत पत्राद्वारे आपल्या भावना सातासमुद्रापलीकडील संबधितांपर्यंत पोहचवितात.

यांना पाठविली पत्रे

इंदिरा गांधी, सोनिया गांधी, पु.ल. देशपांडे, जगतगुरु शकंराचार्य कांचीपुरम् पीठ, सुवर्णमंदीर संस्थान अधिपती अमृतसर, दलाई लामा, मदर तेरेसा आश्रम कलकत्ता, अभिनेता अमिताभ बच्चन, संजय दत्त, नसीरुद्दीन शाह, राजब्बर, डॅनी डेंझोपा यासह क्रिकेटपटू अजित वाडेकर, बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोन, आशा भोसले, मोहमंद रफी, व्ही. शांताराम, टी. रामाराव यांच्यासह शेकडो सेलीब्रेटींना पत्र पाठविली आहेत. पत्रांबरोबरच देश विदेशातील भूकंप, अतिवृष्टी, आपतकालीन स्थितीत यथाशक्ती आर्थिक मदतही पाठविण्यात त्यांचा पुढाकार आहे.

यांनी दिले पत्राचे उत्तर

विदेशातील एलिझाबेथ 2 री लंडन, जपानी राजदूत, व्हॅटकिनसिटीतील 2 रे जॉनपॉल, अमेरिकेचे खासदार राबॅर्ट केमेडी, जॉन केनेडी (अमेरिका), यांच्यासह बोहरी समाज धर्मगुरू डॉ. बुरुहानुद्दीन साहेब, सयाजीराव गायकवाड संस्थान वंशजांचे पत्रही प्राप्त झाले. यासह प्रिया दत्त, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांचेही पत्रे अजूनही संग्रहात आहेत.

2 पेट्या पत्रांचा संग्रह

आजवरच्या कालावधीत अनेक आर्कषक पत्रे गहाळ झाली. उर्वरित दोन पेट्यांचा संग्रह आहे. यातील आर्कषक पत्रे ही अनेक शाळांमध्ये विद्यार्थांना अध्यनासाठी दिली असून यासह अनेक नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षरींचे नमुनेही आपल्याकडे असल्याचे पत्रलेखन छंदकार श्री. बारी यांनी सांगितले.

पत्रांचे भरविले प्रदर्शन

पत्रलेखनाची कला विकसीत व्हावी, व ही संस्कृती टिकून रहावी या उद्देशासह आपण लिहिलेली पत्रे, व देशविदेशातील सेलिब्रेटींकडून आलेली पत्र ही विद्यार्थी, वाचकांना पाहता यावी, यासाठी 10 वेळा पत्रांचे शहरासह विविध शाळा, महाविद्यालये, एक्झीबिशन मध्ये प्रदर्शन मांडले असल्याचेही बारी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...