आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:75/100‎‎ शासकीय कर्मचारी संपात,‎ 31 कार्यालयांत कामे ठप्प‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन याेजनेसह प्रलंबित‎ मागण्यांसाठी मंगळवारपासून‎ सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी‎ बेमुदत बंदच्या आंदाेलनाला‎ सुरुवात केली. त्यात ३१‎ शासकीय कार्यालयांतील ७५‎ टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग‎ नाेंदवत शासनावर दबाव‎ वाढवला. जिल्हाधिकारी‎ कार्यालयावर माेर्चा काढण्यात‎ आला तर जिल्हा परिषदेसमाेर‎ घाेषणाबाजीने परिसर दणाणून‎ गेला. आंदाेलनात माध्यमिक‎ शिक्षकांचाही समावेश असला‎ तरी बारावीच्या पेपरवर काेणताही‎ परिणाम झाला नाही. मात्र,‎ बुधवारी दहावीचा पेपर‎ असल्याने प्रशासनाची धावपळ‎ हाेण्याची शक्यता नाकारता येत‎ नाही. दरम्यान संपात सहभागी‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे‎ दाखवा नाेटीस बजावण्याची‎ प्रक्रिया सुरू हाेती.‎ सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी‎ जिल्हाधिकारी कार्यालयावर‎ मोर्चा काढला. त्यानंतर शिक्षक,‎ शिक्षकेतर, महसूल, कृषी,‎ सार्वजनिक बांधकाम, जिल्हा‎ परिषद अशा विविध शासकीय‎ विभागांच्या कर्मचाऱ्यांनी‎ दिवसभर जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर धरणे आंदोलन‎ केले. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’‎ अशी घोषणाबाजी करण्यात‎ आली. संघटनांच्या प्रतिनिधींनी‎ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी‎ अमन मित्तल यांना दिले. जिल्हा‎ प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी‎ ५ वाजेपर्यंत संपात सहभागी‎ झालेल्या राज्य शासकीय‎ कर्मचाऱ्यांची माहिती शासनाला‎ कळवली आहे.

जिल्हा परिषदेत राेज माेठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, मंगळवारी संपामुळे शुकशुकाट हाेता.‎ शिक्षण : बारावीचा पेपर झाला, दहावीचा प्रश्न‎ मंगळवारी ३८ केंद्रांवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे बारावीचे दोन‎ पेपर झाले. मानधनावरील शिक्षकांनी या पेपरचे काम केले. त्यामुळे‎ कोणताही परिणाम झाला नाही; परंतु बुधवारी दहावीचा भूमितीचा‎ पेपर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज‎ भासणार आहे. संपाबाबत तोडगा न निघाल्यामुळे पर्यायी व्यवस्था‎ करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.‎

जिल्हा परिषद कर्मचारी संघटना‎ समन्वय समितीच्या वतीने जिल्हा‎ परिषदेंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी,‎ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपात‎ सहभागी झाले. सर्व प्रवर्गाच्या संघटनांनी‎ संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा‎ केला आहे. तालुका स्तरावरील सर्व‎ पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र,‎ पशुसंवर्धन केंद्र, प्राथमिक शाळा,‎ उपविभाग बांधकाम, पाणी पुरवठा,‎ सिंचनचे कर्मचारी संपावर आहेत.‎

जीएमसी : ओपीडीत ४७४ रुग्णांची तपासणी‎
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी जुनी पेन्शन‎ योजना लागू हाेण्यासाठी मंगळवारपासून संपावर गेले आहेत.‎ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र कामकाज केले. दुसरीकडे‎ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने काळ्या फिती लावून‎ रुग्णसेवा केली. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने संपाला‎ पाठिंबा दिला आहे. मंगळवारी ४७४ रुग्णांची तपासणी झाली.‎

शिक्षण : बारावीचा पेपर झाला, दहावीचा प्रश्न‎
मंगळवारी ३८ केंद्रांवर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे बारावीचे दोन‎ पेपर झाले. मानधनावरील शिक्षकांनी या पेपरचे काम केले. त्यामुळे‎ कोणताही परिणाम झाला नाही; परंतु बुधवारी दहावीचा भूमितीचा‎ पेपर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज‎ भासणार आहे. संपाबाबत तोडगा न निघाल्यामुळे पर्यायी व्यवस्था‎ करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.‎

जिल्हा परिषद इमारतीत शुकशुकाट, बाहेर मात्र जाेरदार घाेषणाबाजी‎
जिल्हा परिषद कर्मचारी संघटना‎ समन्वय समितीच्या वतीने जिल्हा‎ परिषदेंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी,‎ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपात‎ सहभागी झाले. सर्व प्रवर्गाच्या संघटनांनी‎ संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा‎ केला आहे. तालुका स्तरावरील सर्व‎ पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र,‎ पशुसंवर्धन केंद्र, प्राथमिक शाळा,‎ उपविभाग बांधकाम, पाणी पुरवठा,‎ सिंचनचे कर्मचारी संपावर आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...