आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:दूध संघासाठी पहिल्याच दिवशी 79 अर्जांची विक्री

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत गुरुवारपासून निवडणूक अर्ज करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकूण ७९ अर्जांची विक्री झाली आहे; मात्र, पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीला ३ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे, येत्या १० डिसेंबर रोजी दूध संघासाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात २० जागांसाठी ही निवडणूक होत आहे, निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ७९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झालेली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून पॅनलची तयारी केली जात असून मुंबईमध्ये बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे, दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही राजकीय पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...