आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटिंग डिसॉर्डर:मुलं जेवत नसल्याची 80 टक्के पालकांची डॉक्टरांकडे तक्रार; मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम

जळगाव3 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

ऐन जेवणाच्या वेळी मुलांचे नखरे सुरु होतात. काहीही खायला दिले की तोंड वाकडे करतात ही तक्रार सध्या प्रत्येक घरातून ऐकायला असून यामुळे पालक चिंतेत पडले आहे. दरम्यान इटिंग डिसॉर्डर या आजारामुळे मुले व्यवस्थित जेवत नसल्याचे समोर आले असून यामुळे मुलांचा मानसिक व शारीरिक विकास खुंटत चालला आहे. याबाबत अनेक तक्रारी घेऊन 80 टक्के पालक डॉक्टरांकडे जात असून उपाय विचारत आहे.

आजची पिढी ही जिद्दी झाली असून मुलांना जेवण नको झाले आहे. काही मुलांना बाहेरचे खायला आवडते मात्र काही मुले जेवणाचे नाव काढताच रडणे सुरु करतात. अशा मुलांमध्ये इटिंग डिसॉर्डर दिसून येत आहे. दरम्यान नखरेबाज मुलांना जेवण देताना पालकांनी विविध पदार्थांचा समावेश करावा. यासोबतच मुलांना जेवणाचे ताट आकर्षक सजवून द्यावे, जेवणाआधी शारीरिक काम करण्यास सांगावे. सर्वात महत्वाचे म्हणजे जेवताना मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवावे.

ही आहे डिसॉर्डची लक्षणे

 • जेवणास नकार देणे
 • खाण्याचे अल्प प्रमाण.
 • खाताना चीड चीड करणे
 • जेवण लपवणे किंवा नंतर खातो असे सांगणे
 • आपल्या शरीराची सतत चिंता करणे
 • जेवताना सतत उकडू तिकडे हालचाल करणे.

हे आहे आजाराचे धोके

 • गंभीर शारीरिक समस्या उद्भवतात.
 • शरीरासाठी आवश्यक पोषण तत्वांची कमतरता होणे.
 • शारीरिक आणि मानसिक विकास खुंटणे
 • रोग प्रतिकारशक्ती कमी होणे.
 • वजन कमी होणे.

पालकांनी चुकीच्या सवयी बंद कराव्या

डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले की, मुलांना जेवणाची आवड निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असून यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. जेवणाअभावी डिसॉर्डर बघायला मिळत असून याचा मुलांच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहे. दरम्यान मुलांच्या चुकीच्या पद्धती पालकांनी बंद करणे देखील आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...