आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलघमी:गिरणा धरणातून 800 दलघमी आवर्तन सोडले, जळगावपर्यंत 10 दिवसांत पोहोचले 280 दलघमी; पाचवे आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणा धरण यंदा पावसाळ्यात १०० टक्के भरले होते. त्यातून जिल्ह्यासाठी पाच आवर्तन राखीव करण्यात आले आहेत. यापैकी चौथे आवर्तन मंगळवारी जळगाव शहरानजीकच्या बांभोरी नदीपात्रात पोहोचले. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात जिल्ह्यातील दोन पालिका क्षेत्रासह अनेक गावांच्या पिण्याच्य पाण्याची सोय झाली आहे. पाचवे व शेवटचे आवर्तन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यातून १५०० क्यूसेसचे चौथे आवर्तन १ मे रोजी सोडण्यात आले होते. ते चाळीसगाव, भडगाव, पाचोरा पालिका व पाचोरा एमआयडीसी, दहिगाव संतमार्गे काळनदा येथे दहा दिवसांत पोहचले. या पाण्याचा १५० किमी प्रवास झाला. या मार्गातील शंभरावर गावांची तहान भागणार आहे.

१५०० क्युसेस वेगाने आवर्तन धरणातून १५०० क्युसेस वेगाने दहा दिवसांत ८०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले बाष्पीभवन, बंधारे भरणे, पाणी चाेरी वगळता जळगावपर्यंत २८० दशलक्ष घनफूट पाणी पोहचले.

बातम्या आणखी आहेत...