आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करडी नजर:विसर्जन मिरवणुकीवर साडेआठशे पाेलिस ; व्हिडिआे कॅमेरे, ड्राेनची नजर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षांच्या खंडानंतर शहरात हाेत असलेल्या गणेशाेत्सवात गणेशभक्तांचा उत्साहात आेसंडून वाहत आहे. शुक्रवारी असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीलाही विक्रमी गर्दी हाेण्याचा अंदाज असून त्यात अनुचित प्रकार, पाकिट मारी, साेनसाखळ्या चाेरी, छेडखानीसह सामाजिक सलाेखा बिघडू नये यासाठी ३० अधिकारी व आठशेहून अधिक पाेलिस कर्मचारी, हाेमगार्ड, छेडखानी प्रतिबंधक पथक बंदाेबस्तासाठी असणार आहे. तसेच सहा व्हिडीआे कॅमेरे, दाेन ड्राेनच्या माध्यमातून पाेलिस दलाची करडी नजर विसर्जन मिरवणुकीवर असणार आहे.

उप विभागीय पाेलिस अधिकारी कुमार चिंता यांनी सांगितले की, पाेलिस विभागातर्फे शहरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त सहा व्हिडीआे कॅमेरे, दाेन ड्राेन मिरवणुकीवर नजर ठेवून असणार आहेत. गणेशघाटावर मनपापने सीसीटीव्ही बसविले आहे.भिलपुरा परिसरात टाॅवरची उभारणी : मिरवणूक मार्गात भिलपुरा मशिदीजवळ पाेलिस दलातर्फे मचाण उभारण्यात येणार असून त्यावरून दुर्बिणीद्वारे एआरएफचे जवान मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहे.

पथक मिरवणूक मार्गावर गर्दीच्या ठिकाणी फिरणार
पाेलिस दलातर्फे विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन हाेणाऱ्या पाकीट व साेनसाखळ्या चाेरीच्या घटनांवर नियंत्रण राखण्यासाठी पाेलिस सराईत पाकीटमार व चाेरांवर लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकी दरम्यान, तरुणी व महिलांच्या छेडखानीचे प्रकार हाेऊ नये यासाठी छेडखानी प्रतिबंधक पथक नेमण्यात आलेले आहे. त्यात २५ कर्मचाऱ्यांचा समावेश असून हे पथक सतत मिरवणूक मार्गावर प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी फिरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...