आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदना अभियान:जळगावमध्ये 85 हजार शेतकऱ्यांचे कर्ज थकीत; नूतनीकरणासाठी प्रशासनाचा पुढाकार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना चाहुल लागली आहे ती पावसाची. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु थकीत कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी टाेकाची भूमिका घेत आहेत. त्यापासून त्यांना राेखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे. त्यांना कर्जाची एकरकमी फेड किंवा कर्ज नविनीकरण करण्यात येणार आहे.

बॅंक समाधान मेळाव्याचे आयाेजन

यासाठी शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यताील राष्ट्रीयकृत बॅंकांना साेबत घेत 1 ते 5 जून दरम्यान तालुका व गाव पातळीवर बॅंक समाधान मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील 58 ते 90 हजार शेतकऱ्यांना होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

काय आहे अभियान?

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावे यासाठी अडचणीतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ‘ शेतकरी संवेदना अभियान’ राबवले जात आहे. यात शेतकऱ्यांना वित्त पुरवठा सुरळक्षतपणे करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी 1 जूनपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच माेठ्या गावांमध्ये ‘बॅंक समाधन मेळावे’ घेण्यात येत आहेत.

या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना वित्त पुरवठ्याबाबत माहिती देणे, थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना एक रकमी परत फेड याेजना (ओटीएस) किंवा कर्जाचे नविनीकरण आदी पर्याय सहज उपबलब्ध करून पुन्हा नवीन कर्जासाठी मदत प्रशासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या मेळाव्यांना बॅँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाेबत जिल्हा प्रशासनातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पाेलिस पाटील यांचाही समावेश असणार आहे. या यंत्रणेच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

या बँकांना साेबत घेऊन उपक्रम

शेतकऱ्यांचे कर्जफेड करण्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने मागवली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्वच राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडाेदा, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक यासह एचडीएफसी या प्रमुख बँकांना साेबत घेऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात किमान 85 ते 90 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. 7 जूनपूर्वी शेतकऱ्यांना नवीन हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध हाेणे अपेक्षित आहे. जेणे करून अवाजवी, सावकारी व्याजाचे कर्ज घेण्यापासून शेतकरी वाचू शकतील अशी आशा प्रशासनाला आहे.

बातम्या आणखी आहेत...