आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंधी समाजाचे आराध्य दैवत संत बाबा गेलाराम साहेब यांच्या ९३व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रविवारी सिंधी कॉलनीतील सेवा मंडळात समाजातील पाच ते २५ वर्षापर्यंतच्या अविवाहीत ८८ मुलांवर हिंदू धर्माप्रमाणे वैदीक पद्धतीने जनेऊ संस्कार करण्यात आले. यावर्षी संस्कारात सहभागी बटूंचा उच्चांक राहिला. दिवसभरात विविध धार्मीक कार्यक्रमांसह शोभायात्रा, संताची उपस्थिती हाेती. शोभायात्रेत महिला, ज्येष्ठ, युवकांनी भजने, नृत्य सादर केले. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टने या उत्सवाचे आयाेजन केले हाेते. पहाटे पाच वाजता संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम यांच्या देवरी साहेब समाधीला पंचामृत स्नान करण्यात आला. सकाळी १० वाजता सेवा मंडळापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
त्यात सर्व बटूंचा सहभाग दिसून आला. बटूंसह महिला, ज्येष्ठ नागरिक भजनात तल्लीन झाल्याचे चित्र होते. सजवलेल्या बग्गीवर संत हरदासराम साहेब यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. दुपारी सेवा मंडळात प्रत्येक सहा बटुंमागे एक पुरोहित याप्रमाणे ८८ बटूंवर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात जनेऊ संस्कार करण्यात आले. संत कंवरराम यांचे पंतू साई राजेशकुमार ( अमरावती) व बाबा संत गेलाराम यांचे शिष्य देविदास भाई या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यांनी बटूंना आशिर्वाद दिले. या उपक्रमास देशभरातील विविध प्रांतातून समाजबांधव सहभागी झाले.
प्रबाेधनपर नाटिका : सायंकाळी समाजातील युवक व बालकलाकारांनी ‘एक शाम बाबा के नाम’ ही प्रबाेधनपर नाटीका सादर करण्यात आली. समाजातील प्रत्येकाने दान, धर्म, संस्काराचे पालन करीत आई वडीलांची सेवा करावी असा संदेश देण्यात आला. सेवामंडळ अध्यक्ष दयानंद विसरानी, अशोक मंधान, रमेश मतानी, राम कटारिया, भगत बालाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या सामाजिक कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी परिश्रम घेतले.
बटूंनी केला संकल्प
ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक असलेल्या धाग्याला उजव्या हाताच्या खांद्यावरून भुजेच्या खाली घालण्यात आले. हा बंध बांधून देवऋण, पितृऋण व ऋषीऋण फेडण्याचा संकल्प जनेऊ संस्काराद्वारे बटूंना देण्यात आला. सर्व संताच्या प्रतिमापूजनासह आरती पुरोहितांसह बटूंच्या हस्ते झाली. जनेऊ संस्कार झाल्याशिवाय विवाह करता येत नसल्याने संस्कार न झालेले २५ वर्षापर्यंतचे युवक या कार्यक्रमात सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.