आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरणगाव तालुक्यातील ओझखेडा, पिंपळगाव व तळवेल सात किलोमीटरच्या परिघात असलेल्या तीन गावांमधील नऊ घरे चोरट्यांनी सात व आठ जून रोजी रात्री फोडली. यात तीन घरांमधून ६ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोट्यांनी लांबवला.
नचिकेत चावदस नेमाडे (वय ७३, रा. ओझरखेडा) यांच्या घरातून सर्वाधिक ४ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. तर पिंपळगाव येथील राहुल आत्माराम पाटील यांच्या घरातून ६७ हजार आणि किसन शेनफडू बेंडाळे यांच्या घरातून ६५ हजारांचा ऐवज लांबवला. इतर सहा घरांमध्ये किरकोळ ऐवज चोरीस गेला आहे. या घटनांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमाडे हे ऑर्डनन्स फॅक्टरीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सध्या मलकापूर येथे राहतात. ओझरखेडा गावात त्यांचे मूळ घर आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी गावातील एका प्लॉट अडीच लाखांत विकला. त्यातून मिळालेले पैसे घरातच ठेऊन ते रात्री मलकापूर येथे निघून गेले होते. याच रात्री चोरट्यांनी आझरखेडा गावातील तीन घरे फोडली. यात नेमाडे यांच्या घरातून अडीच लाखांच्या रोकडसह दागिने लंपास केले. तर शेजारच्या पिंपळगाव व तळवेल येथील सहा घर फोडली. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.