आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालत:अपघातात पाय गमावलेल्या मजुराला 9 लाख भरपाई; 15 वर्षे जुन्या वादाचा अब्रुनुकसानीचा दावा तासाभरात निकाली, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश होते उपस्थित

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा न्यायालय, कौटंुबिक न्यायालय, विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने शनिवारी लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतील अपघात भरपाई, शेतीविषयक, फौजदारी तडजोड प्रकरणे, बँक वसुली, वैवाहिक, वीज व पाणी देयके या संदर्भातील खटले सुनावणीसाठी ठेवलेले होते.

बन्नू (वय ५१) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ९ फेब्रुवारी २०२० रोजी रस्त्याने पायी चालत असताना त्यांना ट्रकने (क्रमांक एमएच-१८, बीए-९९७०) धडक दिली. यात त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. उपचारादरम्यान तो पाय मांडीपासून कापावा लागला. दरम्यान, एक पाय कापला गेल्याने सय्यद यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर लोकअदालतीत सुनावणी झाली. रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरपाई मागितली होती. सुनावणीअंती सय्यद यांना ९ लाख २५ हजार रुपयांची भरपाई न्यायालयाने मंजूर करून दिली. सय्यद यांच्यातर्फे अॅड. महेंद्र चौधरी, श्रेयस चौधरी व हेमंत जाधव यांनी काम पाहिले. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्याहस्ते उद‌्घाटन करण्यात आले.

विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. ए. के. शेख, वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव दर्शन देशमुख, सर्व सदस्य, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, पॅनल प्रमुख न्यायाधीश आर. एन. हिवसे, व्ही. बी. बोहरा, व्ही. व्ही. मुंगळीकर, व्ही. जी. चौखंडे, पी. ए. श्रीराम, आर. वाय. खंडारे, अॅड. शरद न्यायदे, महिमा मिश्रा, हाशिम खाटीक, बी. जी. कापुरे, विजय दर्जी, छाया सपके, योगेश पाटील, एस. एस. निकम, मुजीब पठाण, आर. टी. बाविस्कर, लिना म्हस्के, संदीप पाटील, विधी सेवा प्राधिकरण कार्यालयीन अधीक्षक रवींद्र ठाकूर, अविनाश, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबाळकर आदींनी सहकार्य केले. लोकअदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...