आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:मल्हार हेल्प फेअरच्या उद‌्घाटन सोहळ्यात 9 सेवाव्रतींचा सन्मान

जळगाव7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

यंदा फेअरमध्ये एकूण ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाले आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच शासकीय योजनांची माहिती, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू, विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. उद‌्घाटन साेहळ्यास महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, नयनतारा बाफना, अमोल चिमणराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत घंटानाद करून करण्यात आले. एलईडी स्क्रीनवर ज्येष्ठ सेवामूर्तींना देवाच्या स्वरूपात दाखवून एक अनोखा संदेश देण्यात आला. प्रास्तविक केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर यांनी केले. शुभदा नेवे यांनी सूत्रसंचालन केले. सेवामहर्षी पुरस्कार वितरण सोहळ्यात ९ सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, ३ दिवस चालणाऱ्या या फेअरला नागरिकांनी भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन हेल्प फेअरचे सदस्य आनंद मल्हारा यांनी केले आहे.

फेअर म्हणजे पर्वणीच : परुळेलकर
हेल्प-फेअरच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचन परूळेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कोरोनामुळे हतबल झालेल्या सामाजिक संस्थांची व्यथा मांडली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी हेल्प फेअर हे प्रभावी माध्यम ठरू शकते. सेवाभावी संस्था आणि गरजू, दानशूरांना एकत्र आणणारी ही आगळीवेगळी संकल्पना खरोखरच गरजेची असल्याचे सांगितले.

आज रोजगार मेळाव्याचे आयोजन
हेल्प-फेअरमध्ये रविवारी दुपारी १ ते ४ दरम्यान सागर पार्क मैदानावर १२वी विज्ञान किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी १० ते १ वाजे दरम्यान हॉटेल कोझी कॉटेज येथे स्वयंसेवी संस्थांची सामाजिक उद्योजकता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात कांचन परूळेकर ह्या मार्गदर्शन करणार आहे.

मल्हार हेल्प फेअर -४च्या उद‌्घाटन सोहळ्यात ९ सेवाव्रतींच्या गौरवाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, नयनतारा बाफना, अमोल पाटील, कांचन परुळेकर आदी. सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, ३ दिवस चालणाऱ्या या फेअरला नागरिकांनी भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन हेल्प फेअरचे सदस्य आनंद मल्हारा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...