आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केट:महात्मा फुले मार्केटमध्ये 907 गाळे; पण पार्किंग फक्त 560 वाहनांसाठी!

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात दुकान चालवायचे असेल तर संबंधितांनी कोणतेही वाहन सोबत न आणताच व्यवसायाच्या ठिकाणी यावे आणि अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनीही कोणतेही खासगी वाहन वापरू नये, अशीच महापालिकेची अपेक्षा दिसते. त्यामुळेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या व्यापारी संकुलांत जेवढे व्यावसायिक गाळे आहेत तेवढ्या वाहनांसाठीही पार्किंगची व्यवस्था नाही. त्या दुकानांतील इतर कर्मचारी व येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनासाठी पार्किंगचा विचार करणे तर दूरची गोष्ट आहे.

चारचाकी वाहनांसाठी जागाच नाही
मनपाने पर्यावरण अहवालात महात्मा फुले मार्केटमध्ये १० चारचाकी, ३५० दुचाकी, २०० सायकलच्या पार्किंगची व्यवस्था आहे; परंतु परिस्थिती विरुद्ध आहे. इथे कारला प्रवेश करायलाही जागा नाही. तिथल्या व्यावसायिकांसाठीच गरज ९९५ वाहनांची असताना तेथे केवळ ५२% व्यवस्था आहे. ग्राहकांचा विचार तर केलेलाच नाही. अशीच परिस्थिती गांधी मार्केटची आहे. १० दुचाकी, १५ सायकली अशा २५ वाहनांची पार्किंगची साेय नाेंदवली अाहे. पण गाळ्यांची संख्या ३१२ व २४ रहिवासी आहेत.

दाेन्ही मार्केटमध्ये ४५ टक्के व्यवस्था
शहरातील सर्वात जुने मार्केट असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये २५९ तर सेंट्रल फुले मार्केटमध्ये ६४८ गाळे आहेत. याशिवाय महात्मा गांधी मार्केटमध्ये २०६ गाळे असून, २४ रहिवासी फ्लॅट‌्स आहेत. एकंदर तीनही संकुलात मिळून ११३७ गाळे व रहिवासी आहेत; परंतु या तुलनेत संकुलांमध्ये पार्किंगची व्यवस्था ताेकडी आहे. महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटसाठी केवळ ५६० वाहनांची व्यवस्था आहे. तर गांधी मार्केटमध्ये केवळ २५ वाहनांची व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक आणि ग्राहकांची वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत.

गांधी मार्केटमध्ये २०६ गाळे, २४ फ्लॅट‌्स; तरी पार्किंगची सोय मात्र २५ वाहनांसाठीच
म. गांधी मार्केट फुले मार्केट कारवाईची सुरुवात मनपाने स्वत:पासून करायला हवी श हरातील समस्या लक्षात घेता महापालिकेने पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्या खासगी इमारतींवर कारवाई केलीच पाहिजे, हीच ‘दिव्य मराठी’ची ठाम भूमिका आहे; पण ती कारवाई करण्यासाठी महापालिकेला, म्हणजेच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना नैतिक बळ हवे असेल तर आधी स्वत:च्याच चुका दुरुस्त करण्याचे पाऊल त्यांनी उचलले पाहिजे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: काेरडे पाषाण’ असे कसे चालेल? खासगी इमारतींवर कारवाई करण्याचे बळ महापालिकेच्या यंत्रणेत नाही हे नुकतेच समोर आले आहे. मग किमान मनपाच्या इमारतींमध्ये तरी दुरुस्ती करण्याचे बळ या यंत्रणेने दाखवावे, ही जळगावकरांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. -निवासी संपादक दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह

बातम्या आणखी आहेत...