आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शन अदालतीचे आयाेजन:रेल्वेच्या 92 तक्रारींचा पाच तासांतच निपटारा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींबाबत गुरुवारी (दि.१५) शहरातील कृष्णचंद्र सभागृहात द्वितीय पेन्शन अदालतीचे आयाेजन केले हाेते. त्यात प्राप्त ९२ तक्रारींचा पाच तासांतच निपटारा करण्यात आला. एकूण ७ लाख ४७ हजार ५४९ रुपये सेवा निवृत्तांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. तसेच १६ पीपीओचे व परिवार पेन्शनचे रिव्हिजन केले गेले.

डीआरएम एस.एस.केडिया यांनी तक्रारींचा निवाडा केला.सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी वर्षातून दोन वेळा पेन्शन अदालत घेतली जाते. तीन महिन्यांपूर्वी सूचना देऊन तक्रार अर्ज मागवले हाेते. पेन्शन अदालतीत मुख्य न्यायाधीश म्हणून एस.एस.केडिया हे हाेते.

बातम्या आणखी आहेत...