आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:आयटीयआच्या 21 ट्रेडच्या 940 जागा; उद्यापासून प्रवेश

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेला ‘स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’सह आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर थेट अभियांत्रिकीत प्रवेश मिळणार आहे. या कारणाने यंदा आयटीआयचे प्रवेश वाढू शकतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी निकालाची वाट न पाहता शासकीय आयटीआयच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाली आहे. १७ जूनपासून २१ ट्रेडच्या ९४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपासून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. त्याचा लाभ इच्छुक विद्यार्थ्यांना घेता येईल.

दोन ट्रेड मंजुरीसाठी प्रस्ताव
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, ऑपररेटर मेकॅनिकल मशिनिष्ट ट्रेड वाढीव जागांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. मंजुरीनंतर प्रवेश संख्या वाढेल. १७ जूनपासून अर्ज नोंदणी व निकालानंतर प्रवेश सुरू होतील.
ए. आर. चौधरी, प्राचार्य शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

बातम्या आणखी आहेत...