आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मिरात जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या दाेन दिवस आधी गुरुवारी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर अतिरेक्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद झाले. यात जळगाव जिल्ह्यातील पिंपळगावच्या (ता. चाळीसगाव) २२ वर्षीय यश दिगंबर देशमुख या जवानाला वीरमरण आले. २८ नोव्हेंबरला त्यांचे पार्थिव िपंपळगाव येथे आणले जाणार आहे.
यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्यदलात पॅरा कमांडाे म्हणून भरती झालेे. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दाेन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रुजू झाले हाेते. गुरुवारी शरिफाबादेत गस्ती पथकावर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जवान गंभीर जखमी झाले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. अतिरेक्यांविरोधात लष्कराने उत्तरादाखल कारवाई सुरू केली. मात्र तोपर्यंत अतिरेकी घटनास्थळावरून पसार झाले. लष्कराने अतिरेक्यांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.