आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:कांचन नगरात 22 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचन नगरातील 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरात मंगळवारी दुपारी 3 वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चेतन हिरामण सोनवणे (वय 22, रा. भैय्याची वखारीजवळ, कांचन नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन सोनवणे हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. चेतनची घरची परिस्थीती हालाखाची असल्याने त्याची आई व तो मोलमजूरी करून उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी १४ जून रोजी सकाळी चेतनची आई कामावर गेली होती. चेतन सोनवणे हा घरी एकटा असताना दुपारी तीन वाजता त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सायंकाळी चेतनची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेजारच्यांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...