आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण:आरोपीला मदत करणाऱ्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी मागितली लाच; पोलिसांना अटक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित तरुणास मदत करणाऱ्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास दादाराव इंगाेले (वय 52) व पाेलिस उपनिरिक्षक समाधान गायकवाड (वय 32) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी सात वाजता अटक केली. या दोघांनी महिनाभरापूर्वी लाच मागीतली होती.

घटना अशी की, सावदा (ता. रावेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात आकाश नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हा करीत होता. दरम्यान, आकाश मुलीचे अपहरण करुन ज्यांच्या घरी थांबला हाेता ते, आकाशची आई, काका व आत्या यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात येणार होते. तत्पूर्वी इंगोले व गायकवाड यांना तक्रारदार भेटण्यास आले होते. इतर जणांना आरोपी न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 60 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती 15 हजार रुपये ठरले होते. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.

लाच मागीतल्याचे पुरावे मिळालेले असल्यामुळे डीवायएसपी शशीकांत पाटील, पाेलिस निरिक्षक संजाेग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, ईश्वर धनगर व राकेश दुसाने आदींच्या पथकाने मंगळवारी सकाळी सात वाजता इंगोले व गायकवाड यांना राहत्या घरातून अटक केली. दोघांच्या विरुद्ध सावदा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सम्पूर्ण जिल्हा हादरला

अपसंपदेबाबत ठोस माहित नाही

दोघांना अटक केल्यानंतर एसीबीच्या एका पथकाने दोघांच्या घरी जाऊन अपसंपदेची चौकशी केली. यावेळी त्यात काही ठोस माहिती मिळालेली नाही. पुढील चौकशीत या बाबत माहिती मिळण्याची शक्यता एसीबीने व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...