आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ सहायक अधीक्षक अटकेत‎:खावटी टळावी म्हणूनच तारीख‎ वाढवून देण्यासाठी घेतली लाच

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काैटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या एका‎ काैटुंबिक खटल्यात खावटीची रक्कम देणे‎ टळावे या उद्देशाने मुदत वाढवून देण्यासाठी‎ २०० रुपये लाच स्वीकारताना न्यायालयाच्या‎ सहायक अधीक्षकाला लाचलुचपत‎ प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.‎ बी.जे.मार्केट मधील काैटुंबिक न्यायालयात‎ तक्रारदाराचा काैटुंबिक वाद सुरू हाेता.‎ तक्रारदाराने पाेटगी देण्यासाठी मुदत वाढवून‎ देण्याची मागणी केली हाेती.

त्यावर जळगाव‎ येथील काैटुंबिक न्यायालयातील सहायक‎ अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर याने‎ लाचेची मागणी केली हाेती. त्याबाबत‎ तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाकडे तक्रार केली हाेती. गुरुवारी बी.जे.‎ मार्केटमधील गाेविंदा कॅन्टी येथे सापळा‎ रचण्यात आला. या ठिकाणी सहायक‎ अधीक्षक हेमंत बडगुजर याला २०० रुपयांची‎ लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...