आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाख्या एक्स्प्रेसला अपघात:रुळाजवळ बुलडोजरला धडकली एक्स्प्रेस; काही अंतर फरफटतही नेले, थोडक्यात टळला अनर्थ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भरधाव कामाख्या एक्स्प्रेसला रुळाच्या बाजुला काम करणाऱ्या बुलडोजरचा धक्का लागला. या अपघातात कामाख्या एक्स्प्रेसच्या इंजिनचे काही भाग तुटले. गुरुवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.

कामाख्याहुन लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. 12520 अप) ही जळगाव स्थानकावरुन सकाळी 10 वाजुन 23 मिनिटांनी रवाना झाली. दरम्यान पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक रेल्वेरुळाखाली सिमेंटचे ब्लॉक बुलडोजरच्या साह्याने बसवण्यात येत होते. यावेळी बुलडोजरचा काही भाग थेट रेल्वेला धडकला. त्यामुळे बुलडोजर काही अंतर फरफटत गेला. सुदैवाने या अपघातात जीवितहाणी झाली नाही.

झाला मोठा आवाज

मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान एक्स्प्रेसने जे. सी. बी. ला काही अंतरावर फरफटत नेले. लोकोपायटल ने गाडी कंट्रोल करत थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ मात्र निश्चित टळला.

एक तास खोळंबा

कामाख्या एक्स्प्रेसला घटनास्थळी सुमारे एक तास खोळंबा झाला. त्यानंतर बुलडोजर बाजुला हटविल्यानंतर धिम्या गतीने पाचोरा रेल्वे स्थानकावर दुपारी 12 वाजुन 53 मिनिटांनी प्लॅट फार्मवर पोहचली.

बातम्या आणखी आहेत...